सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरांनी पुन्हा घेतली उसळी; जाणून घ्या आजचे नवे दर

ऑगस्ट 6, 2026 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२६ । देशात सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मागच्या काही दिवसापासून घसरणीचा कल असलेल्या सोन्याच्या दरांत अचानक वाढ होऊ लागल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तर जळगावच्या सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

gold jpg webp

GoodReturns च्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,८९० रुपयांची वाढ झाली असून तो १,४९,७३० रुपये इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,६५० रुपयांची वाढ होऊन तो १,३७,२५० रुपये झाला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,१७० रुपयांची वाढ होऊन तो १,१२,३०० रुपये इतका झाला आहे.मात्र, राष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून १ ग्रॅम चांदीचा दर २४० रुपये इतकाच कायम आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीतही दरवाढ

जळगावच्या सराफा बाजारातही गेल्या २४ तासांत सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात सोने प्रति तोळा २,०६० रुपयांनी महागून १,४९,६५९ रुपये, तर चांदी तब्बल ५,१५० रुपयांनी वाढून २,३३,८१० रुपये प्रति किलो झाली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

दरवाढीमागे ही आहेत कारणे

सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. आगामी काही दिवसांतही बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now