ग्राहकांना दिलासा ! सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या जळगावातील दर

जुलै 29, 2026 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२६ । सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार सुरू असताना आज पुन्हा दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ती स्थिर आहे.

gold silver 2 jpg webp

GoodReturns च्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ६६ रुपयांची घसरण झाली आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ६० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५० रुपयांची घट झाली आहे.

या घसरणीनंतर जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम (१ तोळा) सोन्याचा भाव १,४३,५१० रुपये झाला आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,३१,५५० रुपये, तर १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,०७,६३० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, चांदीच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नसून भाव स्थिर राहिले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या भूमिकेनुसार येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने ग्राहकांकडून खरेदी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, सध्या दरात झालेली घसरण ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now