जळगावात सोन्याने पुन्हा ओलांडला दीड लाखांचा टप्पा; एका दिवसात तब्बल इतक्या रुपयांची वाढ?

ऑगस्ट 7, 2026 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | आगामी सणासुदीपूर्वी सोने-चांदी दरात उसळी पाहायला मिळत असून महिन्याभरानंतर सोन्याच्या दराने पुन्हा दीड लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 3,914 रुपयांची, तर चांदीच्या दरात 2,060 रुपयांची वाढ झाली आहे.

gold silver 1 jpg webp

गेल्या 24 तासात झालेल्या वाढीनंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,53,573 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2,35,870 रुपये इतका झाला आहे. या वाढीमुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, या वाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. अमेरिका-इराणमधील तणाव कमी होण्याची शक्यता, अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींना मोठा आधार मिळाला आहे.

याशिवाय, जगभरातील भूराजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. संकटाच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जात असल्याने त्याची मागणी वाढली आहे.

तसेच होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून त्याचाही सकारात्मक परिणाम सोन्याच्या बाजारावर झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना सोन्या-चांदीच्या किमतींतील ही तेजी आगामी काळातही कायम राहते का, याकडे सराफा बाजारासह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now