⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

..म्हणून ते वाट्टेल तसं बरळतायत; नाथाभाऊंच्या ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्त्युत्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. तसंच महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य खडसे यांनी केलं होतं. दरम्यान आता या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्त्युत्तर दिल आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्रांशी फोनवर बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल उत्तर दिले आहे. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं होतं.

आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय.

हे देखील वाचा :