वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसास मिळाली आर्थिक मदत

ऑक्टोबर 7, 2021 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि.१ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, या मयत शेतकऱ्याच्या वारसांना शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या रक्कमेचा धनादेश शेतकऱ्याच्या वारसांकडे सुपूर्द करण्यात आला.

Untitled design 30 jpg webp

निमखेडी खुर्द (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी अजय रुस्तम घोडकी यांच्या अंगावर दि.१ ऑक्टोबर रोजी वीज पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच, झालेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याच्या वारसास शासनाकडून तात्काळ मदत मिळावी असे आदेश आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना केल्या होत्या. दरम्यान, प्रशासनानेही या घटनेची तात्काळ दाखल घेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाकडून गुरुवार दि.७ रोजी रुपये ४ लाख रुपयांची मदत अजय घोडकी यांच्या वारसांना करण्यात आली. या रक्कमेचा धनादेश आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वारसांच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार निकेतन वाढे, मंडळ अधिकारी तायडे, तलाठी अंकिता गवळी, महसूल सहाय्यक गौरव पाटील, संचलाल वाघ, उमेश पाटील, नगरसेवक पियुष मोरे, कैलास डहाके, मंगल फरदळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories