गुन्हेमुक्ताईनगर

मुक्ताईनगर हादरले! जुन्या वादातून तरुणाचा खून; अल्पवयीन संशयित ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे घडली. अबुजर रफीक शेख (वय १९, रा. बेलसवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री सुमारे ८:४५ वाजता अबुजर गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर असताना तिथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला. मागील काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मस्करी करण्यावरून वाद झाला होता. याच जुन्या वादातून दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान संशयिताने अबुजरच्या छातीत चाकूने वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावला.

या प्रकरणी रफीक शेख नुरा (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा मानला असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

संशयित अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्धची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेतील लागू तरतुदींनुसार केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button