मुक्ताईनगरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

सप्टेंबर 15, 2026 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मलकापूरहून अजंदेकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव (ता.मुक्ताईनगर) फाट्याजवळ काळाने घाला घातला. सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. प्रल्हाद मधुकर हिवरे (वय ४०) असं मृताचे नाव असून अपघाताची तीव्रता एवढी होती की, मृताचे शीर धडापासून वेगळे झाले.

pralhad hivare

रावेर तालुक्यातील अजंदे येथील प्रल्हाद हिवरे व ईश्वर नामदेव पवार (३८) हे दोघे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी १८५८) ने मलकापूरहून अजंदे गावाकडे निघाले होते. नायगाव फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद ७५३ या मार्गावरील काम सुरू असताना बीएनए कंपनीच्या डंपर (क्रमांक एमएच १९ सीवाय ४६१७) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अचानक घडलेल्या या भीषण अपघातामुळे अजंदे गावावर शोककळा पसरली असून हिवरे यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now