⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चाळीसगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणानिमित्त एस.टी. महामंडळाच्या चाळीसगाव येथील आगारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेे. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संदीप निकम तर जयहिंद टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रफिक मनियार, पत्रकार गफ्फार मलिक, साहित्यिक रमेश पोतदार प्रमुख अतिथी म्हणून हे होते.

प्राचार्य मणियार यांनी पवित्र कुराणातील संदेशांचा संदर्भ देत पाच महत्त्वाचे मुद्दे विशद करताना रोजा व नमाज पठणाचे महत्त्व पटवून देत कर्मचाऱ्यांना बहुमाेल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी यंत्र अभियंता श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, कर्म-वर्ग अधिकारी प्रशांत महाजन, लेखाधिकारी अल्पेश सोलंकी, सुरक्षा अधिकारी कल्पेश सोलंकी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक किरण काकडे, रमेश राठोड, नितीन पाठक, तुषार महाजन, मोहम्मद अन्सारी, दीपक भोई, फरिद मुल्ला, उदय सोनवणे, आरिफ शेख, शफी शहा, हेमराज जाधव, सईद शेख, भाऊसाहेब हडपे, शाकीर खान, सुरेश गायकवाड, अश्फाक खाटिक, जहीर काझी, जमीर पठाण, अल्ताफ शेख, अरुण जाधव आदींनी परिश्रम घेतले.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन

अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी आनंद व उत्साहाच्या रमजान सणानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन करूणा भाव व दान भावनेचे महत्त्व विशद केले. राज्य परिवहनाच्या येथील आगारातील सर्व रोजेदार मुस्लिम बांधवांचा व प्रमुख अतिथींचा गुलाबपुष्प व टोपी देऊन सत्कार करण्यात आला. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.