शेतकऱ्यांनो सावधान : पुन्हा अवकाळीची चिन्ह

मार्च 24, 2023 10:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची नोंद नव्हती. मात्र, अजून आगामी तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

rain 2 jpg webp

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये २६ मार्चपर्यंत हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अभ्यासकानीं हा अंदाज वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ३ ते ८ मार्च व १४ मार्च ते २० मार्चपर्यंत अवकाळी पाऊस झाला होता. त्यात जिल्ह्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे अद्यापपर्यंत पुर्ण झालेले नाहीत. त्यातच जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पर्यायी पुन्हा शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत पावसाची स्थिती राहणार आहे. मात्र, २७ मार्चपासून हळूहळू वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी होवून कोरडे हवामात वाढणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाजही आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now