उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

सप्टेंबर 15, 2026 6:03 PM

‘सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारीचा जिल्हास्तरीय आढावा

जळगाव लाईव्ह न्यूज । सेवा संकल्प अभियानात लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यान पर्यंत पोहचविण्यासोबतच महत्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.

ddl

जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. घुगे पुढे म्हणाले, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक नियोजन करावे आणि विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम तालुका स्तरावर व शहरात प्रभावीपणे राबवावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या कार्यकाळातील ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा, योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अभियानांतर्गत ‘सेवा सेतू’ उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे / जिवंत सातबारा मोहीम, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते उपलब्ध करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी दिल्या.

‘इनोव्हेशन चॅलेंज’ अंतर्गत जिल्ह्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेटर्स व ग्रामीण भागातील नवीन सोल्युशन्स विकसित करणाऱ्यांना जोडण्यात येणार आहे. ‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत स्थानिक गरजेनुसार रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण आणि ॲनिमियाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. शासकीय व खाजगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला तसेच ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ व ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत ‘विकसित भारत-२०४७’ची सेवा ज्योत यात्रा बाईक रॅली काढून माहिती देण्यात यावी. सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य व पोषण संदर्भातील योजनांची माहिती संबधित विभागामार्फत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी या अभियानासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत तालूका व ग्राम पंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now