भुसावळमध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू

नोव्हेंबर 15, 2022 12:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ शहरातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी असलेल्या विवाहितेचा प्रसुतीदरम्यान प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

jalgaon 2022 11 15T122604.100 jpg webp

आरती सचिन कंडारे (28, वाल्मीक नगर, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आरती या सहा दिवसांपूर्वी प्रसुती झाल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील रीदयम रुग्णालयात उपचारार्थ हलवले असता उपचार सुरू असताना शनिवार, 12 रोजी 8.35 वाजेपूर्वी त्यांचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार नेव्हील जॉर्ज बाटले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now