भुसावळमार्गे पुण्याला धावणाऱ्या या रेल्वे गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले; नेमकं कारण काय?

सप्टेंबर 9, 2026 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकिकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आणि गणेशोत्सवाच्या उत्साहाची तयारी सुरू असतानाच, रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वयनासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. परिणामी या मार्गावरून धावणाऱ्या तसेच भुसावळ विभागाशी संबंधित अनेक रेल्वेगाड्यांवर होणार आहे.

PNRN

पुणे आणि हडपसर यार्डमध्ये अभियांत्रिकी, सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणा तसेच ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे केली जाणार आहेत. या कामांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्यासोबतच अनेक गाड्यांचे मार्ग, प्रवासाचे ठिकाण आणि सुटण्याच्या वेळेत बदल केले आहेत.

नागपूर-अमरावतीच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द

या कामांमुळे १२११४ नागपूर–पुणे, १२११३ पुणे–नागपूर, १२१३६ नागपूर–पुणे, १२१३५ पुणे–नागपूर, ११०२६ अमरावती–पुणे आणि ११०२५ पुणे–अमरावती या गाड्यांच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये २, ३ आणि ४ ऑक्टोबरच्या फेऱ्यांचा समावेश आहे.

या गाड्या पुण्याऐवजी पर्यायी मार्गावरून धावणार

कामाच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गावरून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये १२२२१ पुणे–हावडा, १२२२२ हावडा–पुणे, ११०७८ जम्मूतवी–पुणे, ११०७७ पुणे–जम्मूतवी, २२१३१ पुणे–बनारस आणि २२१७१ पुणे–राणी कमलापती या गाड्या पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड मार्गे धावतील.

तर १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा, २२६८६ चंदीगड–यशवंतपूर, १२७८१ म्हैसूर–हजरत निजामुद्दीन आणि १२१४७ कोल्हापूर–हजरत निजामुद्दीन या गाड्यांना मनमाड–कास्टी–दौंड–कुर्डुवाडी–पंढरपूर–मिरज किंवा कोल्हापूर–मिरज–कुर्डुवाडी–दौंड–अहिल्यानगर–मनमाड या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

पुण्याऐवजी दौंडपर्यंतच प्रवास

काही गाड्यांचा पुणेपर्यंतचा प्रवास रद्द करून त्या दौंडपर्यंतच धावणार आहेत. ११०२६ अमरावती–पुणे ही गाडी १९ आणि २२ सप्टेंबर तसेच २ ऑक्टोबरला दौंड येथेच थांबणार आहे. २२८४६ हटिया–पुणे २ ऑक्टोबरला, २२१७२ राणी कमलापती–पुणे ३ ऑक्टोबरला, तर २०१६२ जबलपूर–पुणे २० सप्टेंबरला दौंड येथे प्रवास समाप्त करेल.

याच्या उलट दिशेने ११०२५ पुणे–अमरावती, २२८४५ पुणे–हटिया, २२१७१ पुणे–राणी कमलापती आणि २०१६१ पुणे–जबलपूर या गाड्या संबंधित दिवशी पुण्याऐवजी दौंडहून रवाना होतील. २२८४५ पुणे–हटिया ही गाडी ४ ऑक्टोबरला दौंडहून सकाळी ११:५२ वाजता, २२१७१ पुणे–राणी कमलापती दुपारी ४:१५ वाजता, तर २०१६१ पुणे–जबलपूर ही गाडी २१ सप्टेंबरला दुपारी १२:२२ वाजता सुटणार आहे.

सुटण्याच्या वेळेत बदल
पुण्याहून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत:
पुणे-हावडा (१२२२१): २१ सप्टेंबर रोजी १७:०० वाजता सुटेल.
पुणे-जम्मूतवी (११०७७): १९ व २३ सप्टेंबरला १७:५० वाजता, ३ ऑक्टोबरला १८:४५ वाजता आणि ४ ऑक्टोबरला १९:३० वाजता सुटेल.
पुणे-नागपूर (१२११३): १९ व २३ सप्टेंबरला १८:१० वाजता, तर २१ सप्टेंबरला १८:०० वाजता सुटणार आहे.
याशिवाय पुणे–हावडा (१२१२९), पुणे–नागपूर (१२१३५), पुणे–दरभंगा (११०३३), पुणे–अजनी (२२१२३), अमरावती–पुणे (११४०६) आणि हडपसर–रेवा (२०१५१) या गाड्यांच्या वेळेतही बदल झाला आहे. अमरावती-पुणे एक्सप्रेस ३ ऑक्टोबरला ३ तास उशिराने, तर पुणे-दरभंगा एक्सप्रेस २३ सप्टेंबरला ४५ मिनिटे विलंबाने धावेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now