महत्वाची बातमी : अनुकंपाधारकांनाचा दिवाळी अगोदर निर्णय होणार

ऑक्टोबर 11, 2022 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । महापौर जयश्री महाजन यांनी अनुकंपाधारकांच्या संदर्भात नुकतीच अधिकाऱ्यांसह एक बैठक घेतली. यावेळी केलेल्या चर्चेतून यंदाची दिवाळी अनुकंपाधारकांसाठी गोड बातमी घेऊन येणार आहे. कारण या बैठकीत प्रतीक्षा सूचीमध्ये असलेल्या ११० अनुकंपाधारकांच्या नावांवर चर्चा करण्यात आली आहे.यामुळे त्यांना नियुक्त्या देण्यासंदर्भात चर्चा झाली असे म्हटले जात आहे.

jalgoan mnp

यावेळी या बैठकीत आयुक्त डॉ विद्या गायकवाड, सहा.आयुक्त अभिजित बाविस्कर, उपयुक्त प्रशांत पाटील, लेखा परीक्षक चंद्रकांत वानखेडे, आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते.

या विषयावर महापौर महाजन यांनी शहर अभियंता पी.एम गिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून यात सहा.आयुक्त अभिजित बाविस्कर, उपयुक्त प्रशांत पाटील, लेखा परीक्षक चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. या समितीला १७ ऑक्टो पर्यंत अहवाल सादर करून २० ऑक्टो पर्यंत त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now