जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरवात झाली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत.

इंडियन ऑइलने आज दि. १ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी १८८५ रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलेंडर १९७६.५० रुपयांचा होता. दरम्यान, सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात विक्रमी २३५४ रुपयांवर पोहोचलेला १९ किलोचा सिलेंडर आता दिल्लीत १८८५ रुपयांवर आला आहे.

राजधानी दिल्लीत आता १९७६.५० ऐवजी १८८५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात २०९५.५० ऐवजी १९९५.५०, मुंबईत १९३६.५० ऐवजी १८४४ आणि चेन्नईत २१४१ ऐवजी २०४५ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडर १०५३ रुपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे.












