जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण 110 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी 10वी, ITI, डिप्लोमा, पदवी आणि B.E./B.Tech उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

कोणती पदे भरली जाणार?
या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) 7, इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I (सिव्हिल) 1, इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 10, इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 1, सायंटिफिक असिस्टंट 2, टेक्निशियन ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) 7, टेक्निशियन ग्रेड-I (मेकॅनिकल) 2, टेक्निकल अटेंडंट 37, असिस्टंट ग्रेड-II 29 आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड-1च्या 14 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?
इंजिनिअरिंग ऑफिसर पदांसाठी संबंधित शाखेतील प्रथम श्रेणी B.E./B.Tech तसेच GATE 2024, 2025 किंवा 2026 पात्रता आवश्यक आहे. इंजिनिअरिंग असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट आहे.
टेक्निशियन पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI, तर टेक्निकल अटेंडंट आणि MTS पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. असिस्टंट ग्रेड-II पदासाठी प्रथम श्रेणी BA/B.Sc./B.Com/BBA/BBM/BCA तसेच मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC) आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. 18 ते 35 वर्षे, वर्षे वयोमर्यादा आहे. वयाची गणना 12 ऑक्टोबर 2026 रोजी केली जाणार आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क किती?
पद क्र. 1 ते 5 साठी GEN/OBC/EWS उमेदवारांना 1,000 रुपये, तर पद क्र. 6 ते 10 साठी 700 रुपये अर्ज शुल्क आहे. SC/ST/PwD/Ex-Servicemen आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची अंतिम मुदत
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नियुक्ती मिळू शकते. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून, उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अधिकृत जाहिरात व अर्ज प्रक्रियेची माहिती तपासून ऑनलाइन अर्ज करावा.











