रक्तदात्यांना मिळणार पन्नास हजाराचा अपघात विमा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद युवक आघाडी जळगाव व समता विचार फाउंडेशन जळगाव यांचा संयुक्त विद्यमाने ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा जवळ फुले मार्केट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदान करणार्या रक्तदात्यांना पन्नास हजाराचा अपघात विमा देखील दिला जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, नगरसेविका सरिता नेरकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, अध्यक्ष वसंत पाटील पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.












