डॉ. छाया ठिंगळे नॅशनल ग्लोबल टीचर अवॉर्डने सन्मानित

एप्रिल 8, 2022 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालतील मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. छाया ठिंगळे यांना आविष्कार फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने नॅशनल ग्लोबल टीचर अवार्डने सन्मानित करण्यात आले.

dr. chaaya jpg webp

डॉ. ठिंगळे ह्या गेल्या २२ वर्षापासून अध्यापन कार्यासोबत सामाजिक कार्यातही निरंतर अग्रेसर आहेत. त्यांनी विविध क्षेत्रामध्ये संशोधन, व्याख्याने विविध राज्य, राष्ट्रीय व इंटरनॅशनल परिषदेमध्ये संशोधन पेपरांची वाचन केले आहे. त्यांच्या यश बद्दल येथील तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष ऍड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, सचिव डॉ.सी.एस.चौधरी, उपाध्यक्ष नारायण चौधरी, संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन, उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories