जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथील विवाहित महिला घरात कोणाला काहीही न सांगता १० ताेळे साेन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख घेऊन निघून गेल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. योगिता संभाजी चौधरी (वय २२) असे या महिलेचे नाव आहे.

शनिवारी रात्री घरातून योगिता चौधरी ही विवाहिता घरात कोणास न सांगता अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून निघून गेली. रविवारपर्यंत तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. गावात, आजूबाजूला व नातेवाईक यांच्याकडे तपास करूनही ती कोठेच मिळून आली नाही. त्यामुळे तिचे पती संभाजी चाैधरी (वय ३२) यांनी येथील पाेलिसांत पत्नी हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार नाेंद करण्यात आली आहे. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हेडकाॅन्स्टेबल अली, मनोहर पाटील करत आहेत.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड







