Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू

सप्टेंबर 16, 2026 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला भीषण अपघात झाला. टायर अचानक फुटल्याने भरधाव टेम्पो अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झालेल्या अपघातात टेम्पोमधील मालाच्या गोण्यांवर बसलेल्या हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी मृत हमालांची नावे आहे.

tmp

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या ४०७ टेम्पोमधून नेण्यात येत होत्या. या वाहतुकीसाठी दोन्ही हमाल टेम्पोमध्ये उपस्थित होते. शेंदूर्णी व गोंदेगाव दरम्यान या वाहनाचे अचानक टायर फुटले. याचा मोठा आवाज झाल्याने वाहनात बसलेले अर्जुन पाटील व जगदीश पाटील हे दोन हमाल घाबरले आणि त्यांनी वाहनातून खाली उड्या घेतल्या. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालय, पहर दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक नंदकुमार शिंद्रे, पो.कॉ. विलास चव्हाण यांनी पाहणी करून मदत कार्य केले आहे. पहूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत अर्जुन पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले असा परिवार असून हमालीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. घरातील कर्ता माणूस गेल्याने दोन हमालांचा परिवार उघडचावर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now