जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२२ । चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या गच्चीच्या जुन्यावरून घरात प्रवेश करत चक्क ५ लाख २८ हजारांच्या ऐवज चोरून नेल्याची घटना २३ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. ही चोरी संतोष सुधाकर राठोड यांच्या घरात झाली आहे.
चोरट्यांनी कपाटात ठेवलेले ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड व ३६ हजार रूपये किंमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीचे ४० भार वजनाचे चांदीचे कडे, १५ हजाराच्या ३० भार वजनाच्या चांदीच्या साखळ्या व ३२ हजार रूपयांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे मणी असा जवळपास ५ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. रात्री राठोड घरी आल्यानंतर चाेरी उघड झाली.
हे देखील वाचा :
- २८ वर्षीय महिलेच्या हत्येने अमळनेर हादरले !
- बाजार करून दुचाकीने घरी निघाले, पण वाटेतच घडलं भयंकर; बापलेकाचा मृत्यू, पत्नी गंभीर
- शेतकऱ्यांना ३४ लाखांत गंडविले; पोलिसांनी व्यापाऱ्यासह पत्नी-मुलाला ठोकल्या बेड्या
- एक लाखाची लाच घेताना पारोळ्याच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटरला अटक
- भीषण अपघाताने महाराष्ट्रात हादरला! बस-ट्रकची समोरा-समोर धडक, 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी