जळगाव लाईव्ह न्यूज । जून महिना काही दिवसांत संपणार असून, जुलै महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे, १ जुलैपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होतील, ज्याचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर थेट परिणाम होऊ शकतो.

खरं तर, जवळजवळ प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होतच असतात. आता 1 जुलैपासून अनेक बदल लागू होणार आहे. एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतींपासून ते रेल्वे तिकीट आणि इतर आर्थिक नियमांमध्ये होणाऱ्या या बदलांमुळे तुमच्या बजेटवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, जुलै महिना सुरू होण्यापूर्वी या नवीन नियमांविषयी माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

१. LPG सिलेंडरच्या किमतीत बदल
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या परिस्थितीवर अवलंबून जुलै महिन्याच एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल होऊ शकतात. याआधीही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
२.रेल्वेने विनातिकीट प्रवासाचा दंड वाढणार
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवरचा दंड आधी २५० रुपये होता. आता हा दुप्पट म्हणजे 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास, महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश आणि रेल्वेत गैरवर्तन करणाऱ्यांवरही कडक कारवाई होऊ शकते.
३. एटीएफ (ATF) इंधन शुल्कात बदल
एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) आणि डिझेल निर्यातीवरील शुल्कात वाढ केल्यानंतर सरकार पुन्हा दरांचा आढावा घेऊ शकते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातल्या स्थितीनुसार जुलैमध्ये एटीएफच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
४.आधार कार्ड ई-मेल अपडेट
१ जुलै २०२६ पासून, तुमच्या आधार कार्डचा ईमेल आयडी अद्ययावत करणे अधिक सोपे होणार आहे. UIDAI ने जाहीर केले आहे की, आधार मोबाईल ॲपद्वारे तुमचा ईमेल ॲड्रेस अद्ययावत करण्यासाठी लागणारे ₹७५ शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी माफ केले जाईल. ही सुविधा १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध असेल. या निर्णयाचा उद्देश अधिकाधिक लोकांना त्यांचे आधार रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यास प्रोत्साहित करणे आणि डिजिटल सेवांपर्यंत त्यांची पोहोच सुधारणे हा आहे.
५. SBI क्रेडिट कार्ड रिवॉर्ड नियम बदलणार
PhonePe SBI Credit Card PURPLE आणि SELECT BLACK कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स कमावण्याची मर्यादा लागू होणार आहे. काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नसल्यामुळे ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
६. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये बदल
कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतींमधल्या चढ-उतारामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीला इंधन दरांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
७. FD च्या व्याजदर आणि नियमांमध्ये बदल
जुलैपासून काही बँका मुदत ठेवींवरील म्हणजेच FD वरील व्याजाच्या दरात आणि संबंधित नियमांमध्ये बदल करू शकतात. नवीन गुंतवणूक किंवा एफडी रिन्युअल करण्याआधी ग्राहकांनी ताजे दर तपासणं फायदेशीर ठरेल.











