⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी जनसंवाद यात्रा – रोहिणी खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । मुक्ताईनगर मतदारसंघातील १८२ गावात जाऊन तेथील जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी एकनाथराव खडसे आणि रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली आहे. यात्रेच्या पंधराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील मांगी,चुनवाडे, थोरगव्हाण,बोरखेडा, कोचुर बु येथील ग्रामस्थां समवेत संवाद साधला.

कोचुर येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी आपल्या भेटी हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे. आज तुमच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात नाथाभाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी आश्वासन दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी भरघोस निधी दिला भविष्यात सुद्धा विकासकामांचा हा वेग कायम राखण्याची रोहिणी खडसे यांनी ग्वाही दिली. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले

यावेळी कोचुर बु येथे कॉर्नर सभेत विनोद तराळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपला परिसर हा केळी उत्पादक परिसर असून सध्या केळी वर आलेल्या सीएमव्ही रोगाने केळी उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे उपस्थितांना विनोद तराळ यांनी आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विलास धायडे,दुध संघ संचालक जगदीश बढे, पंकज येवले,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु.डी पाटील सर,रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, जि प सदस्य कैलास सरोदे, प स सदस्य दिपक पाटील,किशोर चौधरी,योगिता ताई वानखेडे, योगेश पाटील, रामभाऊ पाटील,हेमराज भाऊ पाटील,युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील,सुनिल कोंडे,सुनिल पाटील, कुशल जावळे, राजु कोल्हे,मेहमूद शेख,वाय डी पाटील,जगदीश कोचुरे, अतुल पाटील, शशांक पाटील,सिद्धार्थ तायडे,योगेश्वर कोळी देवांनंद पाटील, मुळा भाऊ पाटील,सुपडू मोरे,अमोल महाजन,रुपेश पाटील,गोपाळ पाटील रविंद्र पाटील,राजेंद्र चौधरी,प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर,विनोद काटे,वसंता पाटील,विशाल रोठे,नितीन पाटील,नवाज पिंजारी ,अक्षय सोनवणे,केतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.