उन्हाचा तडाखा वाढला असून दररोज हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जात आहे. आरोग्य जपण्यासाठी आणि शरीराला गारवा देण्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळ्या शीतपेय, ज्यूसला प्राधान्य दिले जात आहे. जळगावातील एलआयसी कार्यालयामागे असलेला ऊस विक्रेता अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय जोपासत असून उसाचा रस आणखी चवदार आणि आरोग्यवर्धक होण्यासाठी ते त्यात अद्रक, लिंबू आणि पुदिना देखील पिळतात. तळपत्या उन्हात ऊस विक्रेते अण्णा जाधव यांच्याशी साधलेला खास संवाद…!