जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पावर राष्ट्रवादीतून बडतर्फ

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पावर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-भाजपला साथ दिली म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्राद्वारे त्यांना बडतर्फ केले आहे.

बडतर्फ करतांना पत्रात लिहिले आहे कि, धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती ता. धरणगाव, जिल्हा जळगाव सार्वत्रिक निवडणूक २०२३- २०२८ मध्ये आपण पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर्स / पोस्टर्स लावलेले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी / कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचा कोणताही गट नाही. सदरील बॅनर्स/ पोस्टर्स तातडीने काढून टाकण्यात यावेत अशी सूचना दि. २१/४/२०२३ रोजीच्या पत्रान्वये आपणास करण्यात आली होती. आपण वरील सूचनेनुसार कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच याबाबतचा लेखी खुलासा देखील कार्यालयास पाठविण्याची तसदी घेतलेली नाही.

sanjay pawar jpg webp

पक्षविरोधी कृत्य करू नये अशा वारंवार सूचना देऊनही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध कारवाया करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये गैरसमज पसरविण्याचे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब आपणास आज दि. १६/५/२०२३ पासून पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.

तरी यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नयेत. तसे केल्यास आपल्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now