कुलर अंगावर पडला अन् तरुणासोबत घडली जीवघेणी घटना.. भुसावळातील घटना

जुलै 17, 2023 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । तरुणाच्या अंगावर कुलर पडल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात घडली आहे. या प्रकरणाची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भुसावळ येथील बुध्दविहार परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

crime 5 jpg webp

भुसावळ शहरात बुध्दविहार परिसरात राहणारा किशोर विनोद परदेशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वय वर्ष २३ असलेल्या या तरुणाबाबतीत १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हि घटना घडली. किशोर हा घरी उभा असताना त्याच्या अंगावर कुलर पडले. त्यामुळे, त्याला त्यातून विजेचा झटका लागून तो बेशुद्ध झाला.

घटना घडल्यावर त्वरित नातेवाईकांनी किशोरला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासादरम्यान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणाला मृत घोषित केले. या प्रकरणी भुसावळ पोलीस शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या केसचा पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now