तरुणीची दीड लाखात फसवणूक; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 1, 2021 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका अज्ञात व्यक्तीने २३ वर्षीय तरूणीच्या बॅक खात्यातून दीड लाख रूपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Crime jpg webp

रूची अजय जाखोटे (वय-२३, रा. पिंप्राळा, जळगाव) ह्या खासगी नोकरीला असून ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८.३० वाजेच्यादरम्यान त्यांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना कॉल आला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव गाव न सांगता आपण ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून तुमचे ३१३ रूपये तुमच्या खात्या वर्ग करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरूणीने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर काही मिनीटातच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४९ हजार ९९१ रूपये काढण्यात आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now