जळगावात १२ वर्षीय शाळकरी मुलाने उचललं नको ते पाऊल ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सप्टेंबर 12, 2026 4:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील खडके चाळ परिसरात १२ वर्षीय शाळकरी मुलाने जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रोहित राहुल चौधरी (वय १२, रा. लक्ष्मी नगर, जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. रोहितने एवढ्या लहान वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

rohit chaudhari

रोहित हा भुसावळ येथील एका वसतिगृहात राहून तेथील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी तो जळगाव येथील आपल्या घरी आला होता. त्याच्या वडिलांनी नुकतेच खडके चाळ परिसरात नवीन घर घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरच्या रात्री रोहितने कुटुंबीयांना आपण नव्या घरात झोपण्यासाठी जात असल्याचे सांगितले आणि तो खडके चाळ येथील नवीन घरी गेला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याची आई रूपाली या नव्या घरात गेल्या असता रोहितची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला.

कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, रोहितने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. संबंधित घटनेचा तपास सुरू असून, त्यातून मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now