भक्तिमय वातावरणात डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन

सप्टेंबर 14, 2026 9:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे आज दि. १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात आगमन झाले.

ggds

गणरायाच्या आगमनानिमित्त महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला. उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढत महाविद्यालयात बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विधिवत पूजा-अर्चा व स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

गणरायाच्या आगमनानंतर उपस्थितांनी भक्तिभावाने आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी मंगलमय प्रार्थना केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणरायाच्या आगमनाचा सोहळा अधिकच आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’ या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now