गोदावरी आयएमआर मध्ये ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन !

सप्टेंबर 14, 2026 9:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (GIMR), जळगाव येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘गोदावरी कॅम्पसचा राजा’ भव्य आगमन सोहळा व गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

ggd

या गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य अशी सजावट (डेकोरेशन) साकारली आहे. कलात्मक देखाव्यामुळे संपूर्ण परिसर गणेशमयाच्या आणि भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे.

तसेच, सामाजिक बांधिलकी जपत गोदावरी फाउंडेशन व गोदावरी आयएमआर प्रस्तुत ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट’च्या (रोटरी क्लब ऑफ जळगाव एलाईट) वतीने “सहयोग निधी प्रकल्प” राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत श्री गणेश मूर्ती विक्रीतून मिळणारा निधी अनाथ मुलांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी वापरला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम आणि कलात्मक सजावट कॅम्पसमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.

या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now