जुन्या वादातून रामेश्वर कॉलनीतील तरुणाला मारहाण

crime jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर कॉलनीतील तरुणाला काठीसह लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी केंद्राजवळ पवन यशवंत पाटील (37) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 5 मे रोजी रात्री 1 वाजता पवन हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून बाळा सोनवणे आणि भूषण शिंदे व अनोळखी दोन जणांनी पवन याला शिवीगाळ करून काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यात पवन याला गंभीर दुखापत झाली. याबाबत पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी बाळा सोनवणे आणि भूषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now