World Athletics Championships : नीरजची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी.. मिळवलं रौप्यपदक!

जुलै 24, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । भारताचे भालाफेक क्रीडापटू नीरज चोप्रा टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक विजयता ठरला होता. नीरज चोप्राने आणखी एक इतिहास रचला आहे. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आज रविवारी सकाळी झालेल्या भालाफेकीत रौप्यपदक विजेयती कामगिरी केली. चौथ्या प्रयत्नात नीरजने ८८.१३ मीटर अंतरापर्यंत केलेल्या थ्रो ने त्याला रौप्यपदक मिळवून दिलं. ग्रीनादाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरापर्यंत भालाफेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंजू बॉबी जॉर्ज नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. तब्बल १९ वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताला पदक मिळालं आहे. अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००३ साली पॅरिस येथे लांब उडीत सुवर्णपदक विजेयती कामगिरी केली होती.

niraj chopra jpg webp

नीरज चोप्रा यांचा जन्म हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात झाला. नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी येथील खांद्रा या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजनं प्राथमिक शिक्षण पानिपत येथून केलं. प्राथमिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोप्रानं चंदीगडमधील बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच ग्रॅज्युएशन केलं. नीरज लहानपणी खूप लठ्ठ होता.

त्यामुळे गावातील इतर मुले त्याची चेष्टा करत असत. त्याच्या लठ्ठपणामुळे त्याचे कुटुंबीय देखील नाराज होते, त्यामुळे त्याचे काका त्याला वयाच्या 13व्या वर्षापासून धावण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन जाऊ लागले. पण यानंतरही त्याचे मन शर्यतीत लागले नाही. स्टेडियममध्ये जाताना त्याने इतर खेळाडूंना तिथे भाला फेकताना पाहिले, त्यानंतर तोही त्यात खाली उतरला. तिथून त्याने जी भालाफेक करायला सुरुवात केली ती आता ऑलिम्पिकच्या लक्ष्यापर्यंत गेली आहे.

त्याचा पहिला थ्रो नो-थ्रो ठरला., दुसरा थ्रो ८२.३९ मीटर अंतरापर्यंत गेला., तिसऱ्या थ्रो मध्ये नीरजने कमबॅक केलं. ८६.३७ मीटर अंतरापर्यंतच्या या थ्रो ने त्याला चौथी पोझिशन मिळवून दिली., त्यानंतर त्याने चौथ्या थ्रो मध्ये ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक केली. त्यामुळे त्याला रौप्यपदक निश्चित झाले.,ग्रीनादाचा अँडरसन पीटर्स सुवर्णपदकासाठी प्रमुख दावेदार होता. त्याने पहिल्याच थ्रो मध्ये ९० मीटरच अंतर पार केलं. ९०.२१ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. दुसऱ्याप्रयत्नात त्यापुढे ९०.४६ मीटर अंतर गाठलं. अंतिम थ्रो ९०.५४ मीटरवर करत सुवर्णपदक निश्चित केलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now