जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळतर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने चित्रकार विकास मल्हारा यांना यंदाचा ‘टागोर अवाॅर्ड’ देऊन भोपाळ येथे सन्मानित करण्यात आले.
जैन इरिगेशनच्या कला विभागात कार्यरत असलेले मल्हारा यांना प्रख्यात चित्रकार व लेखक अशोक भौमिक व कुलगुरू लेखक संतोष चौबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतातून आलेल्या दाेन हजार कलाकृतींतून अंतिम पाच पुरस्कारात त्यांच्या ॲक्रॅलिक व चारकोलसह पेपर या माध्यमात केलेल्या “अनटायटल्ड-३” या चित्राची निवड झाली होती.