अवकाळीमुळे बाजारपेठेत भाज्या महागल्या

ऑक्टोबर 25, 2022 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. परिणामी बाजारातील पालेभाज्यांच्या आवकवर परिणाम झाला आहे. शहरात सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहेत. बहुतांश भाज्या ५० ते ६० च्या घरात पोहचल्या आहेत. पर्यायी नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

bhajipala jpg webp

पालक, मेथी, आंबट चुका, भेंडी, गवार, चवळी, टमाटे, वांगे यांची बाजारपेठेतील आवक कमी होऊन, मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. यामुळे या पालेभाज्यांचे दर गेल्या महिन्यापेक्षा दुप्पटीने वाढले आहेत. आणखी पंधरा दिवस पालेभाज्यांचे भाव अशाच प्रकारे राहणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सध्या बाजारपेठेत बहुतांश भाजीपाला महाग झाला असतांना, वांगेही ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच दोडके, गवार, चवळी, टमाटे, मिरची आदी भाज्यांना सर्वाधिक भाव असल्याचे दिसून आले.

परतीच्या पावसाचा कांद्यावर फारसा परिणाम झाला नसून, सध्या स्थानिक बाजारापेक्षा नाशिक जिल्ह्यातून कांद्याची आवक जास्त आहे. कांदे २० रुपये किलो असल्याचे दिसून आले.

पाले भाज्या (दर (रुपये किलो))

भेंडी ४०, गिलके ४०, गवार ६०, चवळी ५०, कारले ५०, वांगे ६०



Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now