मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

दुर्दैवी : पत्नीचा झोपेत मृत्यू, पतीने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । पत्नीच्या झोपेतच मृत्यू झाले. हे लक्षात येताच पतीने सुसाईट नोट लिहून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील जारगाव शिवारात गुरुवारी रोजी घडली. दरम्यान, पत्नी गेल्याने मला जीवनात कुणाचाही आधार शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. आमचे अंत्यसंस्कार कुणीतरी करावेत. अन्यथा नगरपालिकेच्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे…अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. नातलगांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

विष्णू नामदेव पाटील (भामरे) (६५) आणि किरणबाई विष्णू पाटील (६०) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यावर शुक्रवारी एकाचवेळी पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते नगरदेवळा येथील मूळ रहिवासी. विष्णू हे गवंडी काम, तर किरणबाई या दुसरीकडे धुणी-भांडी करायच्या. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना अपत्य नव्हते.

विष्णू नामदेव पाटील (भामरे) (६५) आणि किरणबाई विष्णू पाटील (६०) या दाम्पत्यावर शुक्रवारी एकाचवेळी पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते नगरदेवळा येथील मूळ रहिवासी. विष्णू हे गवंडी काम, तर किरणबाई या दुसरीकडे धुणी-भांडी करायच्या. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना अपत्य नव्हते.