जळगावच्या तांबापुरात दुकानांना भीषण आग; परिसरात घबराटीचे वातावरण

जुलै 31, 2026 2:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२६ । जळगाव शहरातील तांबापुर परिसरात दुकानांना अचानक लागलेल्या भीषण आग लागल्याची घटना आज ३१ जुलै रोजी दुपारी घडली. या आगीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या दुर्घटनेत दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

tambapurfire

मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुर भागातील ‘जी एन टेलर्स’ आणि ‘अण्णा पंचर’ या दुकानांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले आणि धुराचे लोट आकाशात पसरले. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे आणि महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अग्निशमन दल व पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच बाधित दुकानदारांना दिलासा दिला.

या भीषण आगीत दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आणल्यानंतरच नुकसानाची अचूक आकडेवारी स्पष्ट होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now