जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चिंचखेडा बु येथे पाळीव कुत्रा मारल्याच्या संशयावरून दोन गटात भांडण होऊन जबर मारहाण झाल्याची घटना ६ रोजी घडली. या घटनेत परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले आहे.
पहिल्या फिर्यादीत मालताबाई सोपान धायडे यांनी संशयित आरोपी सविता कुलकर्णी व दिक्षा कुलकर्णी दोघे रा.चिंचखेडा बु.तसेच सागर गुलाबराव पाटील रा.महालखेडा व त्यांचे सोबत आलेल्या दहा-पंधरा साथीदारांनी दि ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी यांचा पाळीव कुत्रा मारुन टाकला या संशयावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात मालताबाई यांचा मुलगा सतिश सोपान धायडे,सुन पुजा सतिश धायडे,देवराणी निर्मलाबाई समाधान धायडे,व चुलत सुन ज्योती जितेंद्र धायडे या सर्वांना धमकावत जबर मारहाण केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत वरील चार आरोपीसह अज्ञात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.हेड काॅ.विनोद श्रीनाथ करत आहे.
तसेच च दुसऱ्या फिर्यादीत सविता उदय कुलकर्णी यांनी पाळीव कुत्रा मयत झाल्याबाबत संशयित आरोपी सतिश धायडे यास जाब विचारल्याचा राग येऊन मालताबाई धायडे,सतिश धायडे,पुजा धायडे,निर्मलाबाई धायडे, जितेंद्र धायडे, देविदास धायडे,अतुल धायडे यांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
या घटनेतील साक्षीदार सागर गुलाबराव पाटील याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम एच १९ सी क्यु ४२५३ चे तसेच साक्षीदार सतिश पाटील रा.तिवडी ता जळगांव जामोद यांच्या ताब्यातील अशोक लैलेंड कंपनीची बस क्र एम एच २८ एबी ७८७२ अशा दोंन्ही वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस नाईक प्रदिप पिंगळे करीत आहे.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.
हे देखील वाचा :
- जळगावमध्ये अनोखा विवाह : 36 इंच उंचीचा वर आणि 31 इंच वधूने बांधली लग्न गाठ
- ‘एमपीएससी’त यशाने दिली हुलकावणी, नैराश्यातून तरुणाने बहिणीच्या घरी मृत्यूला कवटाळले
- Mansoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता
- लग्न ठरले, अपघात झाला, ‘त्या’ला अपंगत्वाचा धोका दिसू लागला, ‘ती’ ठाम राहिली अन् विवाह पार पडला
- भाजपातर्फे रावेरमध्ये राज्य शासनाचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज