---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा मुक्ताईनगर

विनापरवाना म्हशी व लहान पारडू यांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारा ट्रक जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ मध्यरात्री ट्रकमधून विनापरवाना १३ म्हशी व लहान पारडू यांची निर्दयीपणे कोंबून भरून वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

Untitled design 41 jpg webp webp

माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ बुधवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान ट्रक क्रमांक (आरजे ३७ जीबी २३७१) मधून विनापरवाना बेकायदेशीररित्या निर्दयीपणे १३ म्हशी व एक लहान पारडू यांना दाटीवाटीने कोंबून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व प्रदीप शेवाळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

---Advertisement---

पथकाने कारवाई करत ट्रक क्रमांक (आरजे ३७ जीबी २३७१) या दहा चाकी ट्रकला थांबवून वाहतुकीचे बाबत परवाना विचारला. त्यावेळी चालक सुरेंद्रर रामराव जाट (वय 35, रा.सिकर, राजस्थान), हेमाराव जुनारामजी राणा (वय- 26 राहणार कातर छोटी तहसील बादसर राजस्थान) आणि मुकेश रामप्रसाद जाधव (वय-४८, राहणार इंदोर, मध्य प्रदेश ) या तिघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतुकीबाबत कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणून जमा केला आहे.

या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल राजेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुरेंद्रर रामराव जाट, हेमाराव चुनारामजी राणा आणि मुकेश रामप्रसाद जाधव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडेकर आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---