जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । जून महिना सुरु झाला. पण लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये अद्याप जमा झाला नाही. यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती. आता मात्र महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी ट्विटद्वारे दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. पासबुकवर तुम्हाला कधी किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले याबाबत सर्व माहिती मिळेल.
अडीच हजार महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे. यातून तब्बल अडीच लाख सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, आता यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु तरीही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.