रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनाकडे मागणी

जुलै 11, 2025 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । अद्यापही भुसावळ येथून कोरोना आधी धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरु झालेल्या नसून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजर अद्यापही सुरु झालेली नाहीय, तसेच भुसावळ येथून पुण्यासाठी जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस अमरावती येथून धावत असल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांत नाराजी आहे. यातच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी नुकतेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली. या बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

train jpg webp

श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. त्यामध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे :
नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड थांबा
दानापुर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर थांबा (पुणे मार्ग)
महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर थांबा

रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment