सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) ने विविध निवड पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. उमेदवार एसएससी ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. या भरतीसाठी एकूण २४२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ जून आहे, तर अर्ज शुल्क सादर करण्याची अंतिम तारीख २४ जून आहे.
रिक्त पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
वयाची अट : 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा: 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025