जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी आली आहे. केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा तोळा पुन्हा एक लाखाच्यावर गेला आहे. जाणून घ्या आजचे भाव..

काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मात्र गुरुवारी, ५ जून रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. विशेषतः, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर फक्त १० रुपयांनी वाढलेला दिसून येत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९९,९०० रूपये आहे. आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,३३० प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह सोन्याचा एक तोळ्याचा भाव लाखाच्यावर गेला आहे.
आजचा चांदीचा दर
सोन्याच्या दरातच वाढ झालेली असताना चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. गुरूवार ५ जून रोजी चांदीचा भाव १,०२,१०० रूपये प्रति किलो आहे. आज चांदीचा भाव कालच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढला आहे. ४ जून रोजी एक किलो चांदीचा दर १,०२,००० रूपये होता.