तरुणाने खडसे अनाथाश्रमात वाढदिवस केला साजरा

एप्रिल 13, 2022 2:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । एरंडोल येथील तरुण पियुष परदेशी हे गेल्या दहा वर्षांपासून शहरातील गरीब आणि अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहेत. यंदाही त्यांनी त्यांचा वाढदिवस खडके येथील एका अनाथाश्रमात गरीब मुलांसोबत साजरा केला.

cel jpg webp

तसेच दोन वर्षांपूर्वी दादर स्टेशनवर एक वयोवृध्द रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडताना पाहून पियुष याने आपल्या जीवाची पर्वा न करता ‘त्या’ वृद्धाचे प्राण वाचवले, कोरोना काळात गरजूंना जमेल त्या परीने मदत केली. पियुष परदेशी एक पोलीस शिपाई असून एरंडोल येथील सामान्य कुटुंबातील शेतकरी कैलास परदेशी (पहिलवान) यांचा मुलगा आहे. यावेळी पियुष यांनी आपण भविष्यात अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम उघण्याची इच्छा व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now