भयंकर ! ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं ; महामार्ग ६ वरील घटना

ऑक्टोबर 2, 2023 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एक भीषण दुर्घटना समोर आलीय. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलीय. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून जखमींना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

truck crushed jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून काही कामगार आले होते.

रविवारी दिवसभर काम केल्यानंतर मजूर रस्त्याच्या कडेला असलेल्या टीनशेडमध्ये झोपले होते. दरम्यान, गाढ झोपेत असताना सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक आला आणि थेट टीनशेडमध्ये घुसला.

या घटनेत टीनशेडमध्ये झोपलेले मजूर चिरडले गेले. यातील ४ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ६ मजुर गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now