जळगावात सोने-चांदीच्या दरात विक्रमी तेजी; २४ तासांत तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ?

ऑगस्ट 22, 2026 9:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर स्पष्टपणे दिसून येत आहे. जळगावच्या सराफा बाजारात मागील २४ तासांत चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या दरातही प्रति तोळा २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीच्या दिशेने झेपावत आहेत.

goldsilver

या दरवाढीनंतर चांदीचा भाव २ लाख ४७ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्याचवेळी सोन्याच्या दर १ लाख ६० हजार २०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

१९ ऑगस्ट रोजी सोने १ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति तोळा होते. २० ऑगस्ट रोजी त्यात ४ हजार रुपयांची वाढ झाली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा २ हजार ७०० रुपयांनी भाव वाढल्याने सोन्याचा दर १ लाख ६० हजार २०० रुपये प्रति तोळा झाला. म्हणजेच मागच्या तीन दिवसात सोन्याचे दर तब्बल ७००० हजारापर्यत वाढले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असल्याने गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढत असल्याचे सराफा बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळातही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने-चांदीच्या दराची दिशा अवलंबून राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now