जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या प्रयागराज आणि सुबेदारगंज येथून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे धावणाऱ्या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांचे आता नियमित अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

प्रयागराज–मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस सुरू
गाडी क्रमांक २०४३६/२०४३५ प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्स्प्रेस साप्ताहिक धावणार आहे.२०४३६ प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्स्प्रेस २१ ऑगस्ट २०२६ पासून दर शुक्रवारी प्रयागराजहून सायंकाळी ६.१० वाजता रवाना होईल आणि शनिवारी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

परतीची २०४३५ लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्स्प्रेस २२ ऑगस्टपासून दर शनिवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि रविवारी दुपारी १२.४० वाजता प्रयागराजला पोहोचेल.
या गाडीला सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण येथे थांबे असतील.
सुबेदारगंज–मुंबई अमृत भारत एक्स्प्रेसही नियमित
दुसरीकडे गाडी क्रमांक १४१२१/१४१२२ सुबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस–सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस देखील साप्ताहिक धावणार आहे.१४१२१ सुबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्स्प्रेस २७ ऑगस्टपासून दर गुरुवारी दुपारी १२.१० वाजता सुबेदारगंजहून सुटेल. ही गाडी शुक्रवारी रात्री ८.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
परतीची १४१२२ लोकमान्य टिळक टर्मिनस–सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस २८ ऑगस्टपासून दर शुक्रवारी रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी ७.३० वाजता सुबेदारगंजला पोहोचेल.
या गाडीला फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम कर्वी, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असतील.
दोन्ही अमृत भारत एक्स्प्रेसची डब्यांची रचना समान राहणार आहे. प्रत्येक गाडीत ११ सामान्य श्रेणीचे, ८ स्लीपर श्रेणीचे, १ पॅन्ट्री कार आणि दिव्यांगजनांसाठी तसेच सामान व गार्डसाठी २ कोच असतील. त्यामुळे प्रत्येक गाडीला एकूण २२ डबे असणार आहेत.











