भुसावळात धान्य व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटणारे तिघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात

ऑगस्ट 20, 2026 12:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर परिसरात धान्य व्यापारी अजय कोटेचा यांच्यावर हल्ला करून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. संशयित आरोपींमध्ये एक भुसावळ शहरातील तर दोन जण मध्य प्रदेशातील आहेत. तपास सुरू असल्याने पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केलेली नाहीत.

crime 2 jpg webp

पोलिसांच्या प्राथमिक तपासात भुसावळातील एक संशयित आणि मध्य प्रदेशातील दोन्ही संशयितांचा या आधी कारागृहात परिचय झाला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते. या तिघांनी मिळूनच भुसावळात रस्तालुटीचा कट रचल्याचे तपासात समोर आले.

या कटानुसार अजय कोटेचा यांचा पाठलाग करून टीव्ही टॉवर परिसरात त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकण्यात आली. त्यांच्या डोक्यावर लाडकी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याजवळील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लुटून तिघे पसार झाले होते.

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांचा वापर आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपास केला. त्यात तिसऱ्याच दिवशी तिघे पोलिसांच्या हाती लागले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लुटलेली रक्कम आणि वापरण्यात आलेले साहित्य कुठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now