जळगावच्या सुप्रीम कॉलनीत दोन गटांत दगडफेक; दोन युवक जखमी

ऑगस्ट 21, 2026 9:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत किरकोळ दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत दोन युवक जखमी झाले असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

suprimcolonydagad

प्राथमिक माहितीनुसार, दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच दगडफेकीत झाले. यात दोन युवक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दगडफेकीनंतर परिसरात जमाव जमा झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती शांत केली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now