जळगाव लाईव्ह न्यूज । सोन्यासह चांदी दराने पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात दर कमी झाले होते. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा दर वाढली आहेत. आज सोन्याच्या दरात साडेचार हजार रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 1 लाख 57 हजार 700 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ खाली आहे. चांदीचा दर 2 लाख 30 हजार रुपयांवर वाढून 2 लाख 48 हजार रुपये प्रति किलो झाला आहे. हे दर विनाजीएसटी आहेत.

सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या मूल्याची स्थिती, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत.
दरातील अनिश्चिततेमुळे ग्राहकही सावध झाले आहेत. दर कमी होतील या अपेक्षेने काही जण खरेदी पुढे ढकलत आहेत, तर दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहक उपलब्ध दरातच खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.











