⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । शिरसोली गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 1 मे रोजी रात्री 8 वाजता मुलगी ही घरी असतांना गावातील मगन रामकृष्ण मोरे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले.

याबाबतचा संशय पीडीत मुलीच्या वडीलांनी व्यक्त करीत गुरूवार, 5 मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीत आरोपी मगन मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.