जळगाव जिल्हायावल

यावलला तरुणांच्या पुढाकाराने वाचले गायीचे प्राण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ ।
यावल‎ येथे ‎एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बेशुद्धावस्थेतील जखमी गायीवर‎ तरूणांच्या पुढाकाराने उपचार झाले.‎ नंतर गायीला गोशाळेत पाठवण्यात‎ आले. असून, तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे‎ गायीला जीवदान मिळाले.‎ या तरुणांच्या‎ पुढाकाराचे शहारत कौतुक होत आहे.‎

शहरात मोकाट गुरांचा वावर‎ वाढला आहे. मोकाट गुरांमुळे‎ रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचण‎ निर्माण होते. काहीवेळा या गुरांना‎ वाहनांची धडक बसते. अशाच‎ ‎एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय‎ गंभीर जखमी झाली होती. जखमी‎ अवस्थेत ही गाय फैजपूर‎ रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल‎ पंपाच्या मागे व्यासनगरात‎ बेशुद्धावस्थेत पडून होती. बबलू‎ येवले, श्रीयुक्त वाणी या युवकांचे‎ लक्ष गायीकडे गेले. त्यांनी डॉ.‎ विवेक अडकमोल यांना याबाबत‎ माहिती दिली.‎ डॉ.अडकमोल यांनी गायीवर‎ मोफत उपचार केले. त्यामुळे‎ गायीची प्रकृती सुधारल्याने गायीला‎ राहुल कोळी, हर्षल ठाकरे या‎ तरूणांच्या पुढाकाराने अंजाळे‎ येथील गोशाळेत पाठवण्यात आले.‎

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button